मध्यरात्री टेम्पो चालकास लुटले- नाशिक फाट्यावरिल घटना
मध्यरात्री टेम्पो मध्ये आराम करत असलेल्या चालकाला दोघांनी लुटले. ही घटना कासारवाडी येथील नाशिक फाट्यावर शनिवारी (दि. 10) मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास घडली.
प्रसाद तुकाराम म्हस्के (वय 35, रा. दिघीगाव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टेम्पो चालक आहेत. ते भोसरी कडून कासारवाडीकडे टेम्पो घेऊन जात असताना त्यांना झोप येऊ लागल्याने त्यांनी नाशिक फाटा येथे टेम्पो रस्त्याच्या बाजूला पार्क केला. फिर्यादी टेम्पोमध्ये आराम करत असताना दोन अनोळखी तरुण तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची साखळी आणि 10 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.