September 28, 2023
PC News24
धर्म

आळंदीत माऊलींच्या मंदिरात वारीच्या पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याची घटना..पोलीस-वारकऱ्यांमध्ये झटापट

आळंदीत माऊलींच्या मंदिरात वारीच्या पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याची घटना..पोलीस-वारकऱ्यांमध्ये झटापट

 

श्री क्षेत्र आळंदीत आषाढी वारीकरिता राज्यभरातून लाखो भाविक जमले होते. या वारीला पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याची घटना घडली आहे. आज संध्याकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढपूरच्या दिशेने प्रस्थान होत असतानाच पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये काही शाब्दिक चकमक आणि झटापट झाली.

47 दिंड्यांना मंदिरात प्रवेशाची परवानगी देण्यात आली होती. यातील प्रत्येक दिंडीतील 75 वारकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश दिला जातो. पण यातील काही वारकऱ्यांना पोलिसांनी मंदिरात प्रवेश नाकारला. त्या वारकऱ्यांनी प्रवेश देण्याचा आग्रह केल्याने पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाली.

मंदिर प्रवेश करण्यासाठी वारकरी आग्रह धरत होते. पण याचवेळी पोलिसांनी वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वारकऱ्यांनी पोलीस बंदोबस्तातील कर्मचारी आणि बॅरिकेट्स ढकलून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पुन्हा पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पण वारकरीही चांगलेच संतापले होते. अशात पोलिसांनी काही वारकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

 

या घटनेमुळे मंदिर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होते. या प्रकारानंतर पोलिसांनीही मंदिरात बंदोबस्त वाढवला आहे.

Related posts

देश;अयोध्या-रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याची तारीख ठरली.

pcnews24

सर्व मंदिरे पर्यावरण पूरक आणि प्रदूषण मुक्तीची आदर्श केंद्रे होणार*-पिंपरी चिंचवड पर्यावरण संरक्षण गतीविधीचा स्तुत्य उपक्रम.

pcnews24

पिंपरी चिंचवड जैन समाजाचे संपूर्ण चातुर्मास कार्यक्रम- मंगल प्रवेश व शोभा यात्रेने सुरुवात.

pcnews24

पिंपरी चिंचवड:पालखी सोहळ्यात पोलिसांचे चोख नियोजन, कौतुकास्पद रचना.

pcnews24

पुण्यात विविध ब्राम्हण संघटनांतर्फे सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न

pcnews24

ढोल-ताशा वादनाच्या कार्यक्रमामुळे भक्ती-शक्ती चौकातील वाहतुकीत शनिवारी बदल.

pcnews24

Leave a Comment