September 23, 2023
PC News24
राजकारण

गुन्हे शाखा पोलिसांनी शरद पवार यांना धमकी देणाऱ्या पोस्टची घेतली गंभीर दखल,आयटी इंजिनीअरला पुण्यातून अटक.

गुन्हे शाखा पोलिसांनी शरद पवार यांना धमकी देणाऱ्या पोस्टची घेतली गंभीर दखल,आयटी इंजिनीअरला पुण्यातून अटक

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून मागील आठवड्यात धमकी देणारी पोस्ट व्हायरल झाली होती त्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीला रविवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (३४) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पुण्यातून अटक करण्यात आली. तो आयटी इंजिनीअर आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपीला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने फेसबुकवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ नावाचे पेज तयार केले होते. शरद पवार यांना उद्देशून ‘तुम्ही लवकरच दाभोलकर व्हाल’, अशी धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याशिवाय सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलनेही आक्षेपार्ह भाषा वापरून शरद पवार यांची औरंगजेबाशी तुलना करणारा मजकूर पोस्ट केला आहे. या दोन्ही पोस्ट्स व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले.

 

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन आरोपींच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर एलटी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढे हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.

दरम्यान सागर बर्वे याने हे कृत्य का केले, यामागे त्याचा उद्देश काय होता याचा शोध आता पोलीस घेत आहेत.युनिट २ ने इलेक्ट्रॉनिक टेहळणीच्या आधारे सागर बर्वेला अटक केली.

Related posts

अहमदनगर : नाभिक समाजही आता आरक्षणासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात

pcnews24

राष्ट्रवादी नेते मंत्री नबाव मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाचा जामीन मंजूर; प्रकृतीच्या कारणास्तव २ महिन्यांसाठी बाहेर.

pcnews24

रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का

pcnews24

महाराष्ट्र:अजित पवार यांचे अत्यंत प्रभावी, आक्रमक आणि भावनिक आवाहन.

pcnews24

महाराष्ट्र: ‘निलम गोऱ्हे यांचा पक्षप्रवेश ऐतिहासिक’

pcnews24

मोदींच्या समर्थ नेतृत्वाखाली भारताची वेगाने प्रगती;डॉ. मनमोहन सिंग

pcnews24

Leave a Comment