पारंपरिक वेषभूषा परिधान करून साहित्यिकांचा दिंडीत सहभाग
ज्ञानोबा माउली – तुकाराम’ , ‘जय जय रामकृष्ण हरी’ असा जयघोष करीत ,पर्यावरण संवर्धनाची घोषवाक्ये,संतवचने, आणि स्वरचित भक्तिगीतांच्या ओळींचे फलक हाती घेऊन,साहित्यिक पारंपरिक वेषभूषा परिधान करून ‘पिंपरी चिंचवड मधील साहित्यिक दिंडीत उत्साहात सहभागी झाले होते.
साहित्यिकांच्या या दिंडीने संत तुकाराम महाराज पालखीत सहभाग घेतला.सुभाष चव्हाण यांनी संत नामदेव, सुरेश कंक यांनी वासुदेव आणि संगीता जोगदंड यांनी संत जनाबाईचा तंतोतंत वेषभूषा परिधान करून हातात वीणा, टाळ – चिपळ्या आणि डोक्यावर तुळस घेऊन अभंग, भक्तिगीते गात केलेली वाटचाल असंख्य भाविकांना भावली. ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, डॉ. पी. एस. आगरवाल, शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर, सुहास घुमरे, सविता इंगळे, अण्णा जोगदंड, कैलास भैरट, फुलवती जगताप, शामराव सरकाळे,
शिवाजी शिर्के, सुभाष चटणे, दत्तात्रय कांगळे, योगिता कोठेकर, आत्माराम हारे, रघुनाथ पाटील, रेखा कुलकर्णी, हेमंत जोशी, भाऊसाहेब गायकवाड, सुरेश कोंडे, जयश्री घावटे, संजय गमे, अंबादास रोडे, बाळकृष्ण अमृतकर, प्रकाश ननावरे, अनंत पाठक, मुकुंद जोशी, अशोक वानखेडे, प्रकाश रणदिवे, देवेश रणदिवे, जयविजय जगताप या लेखक,कवींनी सहभाग घेतला