चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न… पतीला अटक
पत्नीचा गळा आवळून तसेच विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला,याप्रकरणी पीडितेच्या मुलीनेच वडिलां विरोधात पिंपरी पोलिसात फिर्याद दिली त्यामुळे पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 10 जून रोजी पिंपरी येथे हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. यावरून त्याने पत्नीला जिवे मारण्यासाठी त्याने रिक्षात घेवून जाऊन, तुला संपवून टाकतो असे म्हणत विषारी औषध पाजले, गळा आवळून तसेच दगडाने डोक्यात मारून जिव घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीला गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.