पिंपरी चिंचवड:अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे वैष्णवांना पाच हजार कापडी पिशव्यांचे वाटप
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीचे यंदाही मोठ्या उत्साहात स्वागत केले. महिला वर्गाने रांगोळ्या काढून आणि फुगड्या घालून वारकऱ्यांचे स्वागत केले .
ब्राह्मण महासंघ कायमच प्लास्टिक मुक्त भारत अभियानामध्ये अग्रेसर राहिलेला आहे . ब्राह्मण महासंघ वारकऱ्यांना प्लास्टिक पिशव्या वापरू नका हा संदेश दरवर्षी देत असतो. आणि त्यासाठी नाविन्यपूर्ण व कायम उपयोगात येतील अशा वस्तू दिल्या जातात.
यावर्षी 16 बाय 12 साईजच्या कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले. यासाठी वैष्णवांना ब्राह्मण महासंघाकडून पाच हजार कापडी पिशव्या वाटण्यात आल्या.ब्राह्मण महासंघाच्या इतर सभासदांनी हातात टाळ धरून वारकऱ्यांसोबत वारी मध्ये चालण्याचा आनंद लुटला.
वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी महासंघाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, महेश बारसावडे ,सचिन बोधनी ,प्रवीण कुरबेट, स्मिता येवलेकर, मकरंद कुलकर्णी ,पूर्वा बारसावडे ,दिलीप कुलकर्णी ,सारंग कुलकर्णी ,सचिन कस्तुरे ,राहुल गोडसे, पराग मुळे ,अजय कुलकर्णी, शामकांत कुलकर्णी, राहुल कुलकर्णी ,संध्याताई कुलकर्णी ,मंजिरी सहस्त्रबुद्धे व इतर अनेक महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.