दिल्ली: विमान तिकीट दरवाढीवरून सरकारवर निशाणा
काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्ली-मुंबई फ्लाइटच्या तिकिटांचे दर 15000 रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा करत सरकारवर निशाणा साधला आहे. ‘हवाई चप्पल घालणारे हवाई जहाजात प्रवास करणार, असे पंतप्रधानांनी म्हटले होते, पण आता त्यांचे शब्द थट्टा केल्यासारखे वाटते,’ असे ट्विट वेणुगोपाल यांनी केले. पण 6 जूनपासून 14 ते 60% दरकपात करण्यात आली, असे उत्तर केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी दिले.