आधार कार्ड काढून १० वर्षे झाली ? आधार अपडेटचा उद्या शेवटचा दिवस
आधार कार्डची 10 वर्षे उलटून गेलेल्यांसाठी आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत उद्या संपणार आहे. माय आधार पोर्टलवर 14 जूनपर्यंत तपशील विनामूल्य अपडेट केले जाऊ शकतात. आधार कार्डमधील चुकलेले नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, फोन नंबर, ई-मेल विनामूल्य दुरूस्ती करता येईल. फोटो, आणि बायोमेट्रिक तपशील अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर 50 रुपये शुल्क भरावे लागेल.