लाच घेताना पोलीस हवालदाराला अटक
पुणे- येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात 13 हजार रूपयांची लाच घेतना एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले. राजेंद्र दीक्षित असे या हवालदाराचे नाव आहे. याच्यासह त्याला मदत करणाऱ्या दोन अन्य पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार अपघाताची तक्रार दाखल करून घेण्यासाठी तक्रारदाराकडून दीक्षित यांनी 20 हजार रूपयांची लाचेची मागणी केली. पण नंतर दीक्षित 13 हजार रूपयांवर मान्य झाले.