महापालिका संघाच्या भेदक गोलंदाजीने पनवेल पँथर संघावर दणदणीत विजय.
पुणे जिल्हा असोसिएशनच्या समरलीग स्पर्धा 2023 ची ट्वेंटी लीगमध्ये पिंपरी -चिंचवड महापालिका क्रिकेट संघाने पनवेल पॅंथर अकॅडमीचा 10 गडी राखून पराभव करत स्पर्धेमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
पनवेल पँथरने प्रथम फलंदाजी करून 14.3 षटकांमध्ये सर्व बाद 46 धावा केल्या.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कर्णधार राहुल चावरिया याने 4 धावा मध्ये 5 गडी बाद करून भेदक गोलंदाजी करून निम्मा संघ गारद केला. गणेश कापसे ने 7 धावा देत 3 गडी बाद करून सुरेख साथ दिली. पँथर संघाकडून सुमीत घाडये याने 15 धावा केल्या. पालिका संघाने धावांचा पाठलाग करताना फक्त 3.4 षटकांमध्ये सलामीवीर उमेश शिंगाडे व ओंकार पवार यांनी आक्रमक फलंदाजी केली.47धावा करून दणदणीत विजय मिळविला.
धावफलक :
पनवेल पॅंथर अकादमी फलंदाजी 14.3 षटकात सर्व बाद 46 धावा
सुमीत घाडये 15 ,चैतन्य निगडुसे 9 , पीसीएमसी संघ गोलंदाजी राहुल चावरिया 5/4 , गणेश कापसे 3/7 , उमेश शिंगाडे1/13 , विकास शिरवळे (1/17 )