September 23, 2023
PC News24
जिल्हा

पवना धरण पूर्णपणे सुरक्षित : जलसपंदा विभाग अहवाल

पवना धरण पूर्णपणे सुरक्षित : जलसपंदा विभाग अहवाल

केंद्र सरकारच्या धरण सुरक्षा कायद्यानुसार, पावसाळ्यापूर्वी तपासणी करण्यात आलेल्या मावळातील पवना धरण सुरक्षित आहे असा अहवाल जलसपंदा विभागाने दिला आहे.

केंद्र सरकाराने धरण सुरक्षा धोरण ठरविले आहे, त्यानुसार सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचा अहवाल धरण सुरक्षा संघटनेला दिला जातो. धोरणानुसार पावसाळ्यापूर्वी मावळातील पवना धरणाची नुकतीच पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले असून धरणाला कोणताही धोका नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

पावसाच्या पाण्याचे मोजमाप करणे, धरणांच्या दरवाजाला सील बसविणे, त्यांना ग्रीसिंग करणे,या यंत्रणांची तपासणी करण्यात आली आहे. धरणांवर वीजपुरवठा, सायरन व वायरलेस या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत का? हे देखील तपासण्यात आले. दरम्यान, पवना धरणामध्ये सध्या 23 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा जुलैअखेर पर्यंत पुरेल एवढा असल्याचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी सांगितले.

Related posts

IPL 2023: विराट कोहलीचा बंगळुरू संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? ‘या’ खेळाडूंवर असेल मदार

Admin

जमाबंदी मुंबईत आजपासून लागू!!

pcnews24

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगांव निवासस्थानी १८ तास वाचन उपक्रम.

pcnews24

नातीला भेटायला आलेल्या आजीची निर्घृण हत्या!! 

pcnews24

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने पहिल्या बंधुता भूषण पुरस्काराची घोषणा,समाजनिष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल आणि नामवंत दंतरोपणतज्ज्ञ डॉ. विजय ताम्हाणे यांची निवड

pcnews24

तब्बल 3 वर्षानंतर आरसीबी होमपीचवर खेळणार, ‘या’ 5 खेळाडूंवर असणार ट्रॉफी जिंकण्याची जबाबदारी

Admin

Leave a Comment