रहाटणी: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनी केली आत्महत्या
पती व सासरच्या इतर सदस्यानी केलेल्या छळाला कंटाळून रहाटणी येथे विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना 15 मे ते 9 जून या कालावधीत घडली आहे.
याप्रकऱणी आत्महत्या केलेल्या महिलेच्या बहिणीने वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.12) फिर्याद दिली असून पती शिवलिंग संग्राम बोधने , शिवप्रसाद उर्फ प्रसाद बेल्लाळे व एक महिला आरोपी, तिघेही रा. रहाटणी यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या बहिणीविषयी महिला आरोपी व शिवप्रसाद हे पतीच्या मनात मयत पत्नी विरोधात चारित्र्याचा संशय निर्माण करत होते. त्यामुळे आरोपी पतीने त्यांचे ऐकून पत्नीस त्रास दिला. त्यांच्या या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली. अशी माहिती घेवून वाकड पोलीसानी गुन्हा दाखल केला आहे. रहाटणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.