मोदी सरकावर जॅक डॉर्सीचे गंभीर आरोप,केंद्राचे प्रतिउत्तर
ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सीने मोदी सरकारवर एका मुलाखतीतून गंभीर आरोप केले आहेत. “भारतात कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना भारत सरकारने ट्विटर बंद करणे आणि कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापेमारी करण्याची धमकी दिली होती, असा दावा डोर्सी यांनी केला होता. तसेच ट्विटर ब्लॉक करण्यासाठी आपल्यावर दबाव आणत होते.
केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी हे खोटे बोलत आहेत आणि खोटे दावे करत आहेत, मात्र आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर 2020-2022 या वर्षात ट्विटरने भारतीय कायद्याचे उल्लंघन केले होते,अशी माहिती दिली आहे.