अकोला :नाव आणि धर्म लपवून सैय्यद ने तरुणीवर केले अत्याचार
फेसबुकवरून एकमेकांची ओळख झाल्यानंतर एका व्यक्तीने ३२ वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करत अनेकदा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अकोला येथून समोर आली आहे. त्याचं खरं नाव सैय्यद शरीफ सैय्यद सफी आहे. त्याने वेळोवेळी तिच्याकडून ३ लाख ७० हजार रुपये घेवून फसवणूक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट तालुक्यातील रहिवासी असलेली ३२ वर्षीय तरुणीचं फेसबुकवर अकाउंट होते. तिला तीन वर्षांपूर्वी प्रेम पाटील या नावाने रिक्वेस्ट आली होती. तिने ती रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर दोघांमध्ये चांगली ओळख झाली. एकमेकांसोबत बोलू लागले. काही दिवसानंतर प्रेमने तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर दोघेही व्हाट्सअप वर सक्रिय झाले. मैत्री घट्ट झाल्यानंतर प्रेमने तरुणीला तीन हजार रुपये उसने मागितले. अन् तिनेही पैसे दिले. हळूहळू तो तिच्या घरापर्यंत पोहचला. पूजाचा पती घरी नसताना प्रेम तिच्या घरी यायचा. त्यानंतर प्रेमने तरुणीच्या मोबाईलमधून तिच्या पतीसह नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक घेतले. काही काळाने आपण दोघे बोलतोय, या संदर्भात तुझ्या पतीला सांगेल अशी धमकी देऊ लागला. मग प्रेमने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. नाईलाजाने पूजाला मागणी मान्य करावी लागली. परंतु काही दिवसानंतर तरुणीला प्रेमचे सत्य कळलं. प्रेमचे खरे नाव सैय्यद शरीफ सैय्यद सफी असं असल्याचं समजले. दरम्यान प्रेमने सुरुवातीला आपलं नाव आणि धर्म दोन्ही गोष्टी लपवल्या होत्या. तसेच तो अविवाहित असल्याचं सांगितलं होते.
१५ मे रोजी तरुणीच्या मुलाची अकोल्यात परीक्षा असल्याने पती अन् मुलगा दोघेही अकोल्यात गेले असता पुन्हा सैय्यदनं घरी तिच्यावर अत्याचार केला.
पती आणि मुलगा घरी आल्यानंतर ती माहेरी मुलांसह निघुन गेली. माहेरी असताना सैय्यद शरीफ सैय्यद सफी याने वारंवार फोन करून तु लवकर परत ये, तु जर परत आली नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेन, अशी धमकी दिली. अखेर तिचा संयम संपला आणि सर्व घडलेला प्रकार भावाला सांगितला. त्यानंतर पतीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले. अकोट शहर पोलीस ठाण्यात सैय्यदविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सद्यस्थितीत आरोपी हा कारागृहात असून याप्रकरणी अधिक तपास अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे करीत आहेत.