सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अजूनही आरोपपत्र नाही
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आज तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही अजून सीबीआयने आरोपपत्र दाखल केले नाही. सुशांतने मुंबईमध्ये 14 जून 2020 रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूला त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती कारणीभूत असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणी रियाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. पण अजूनही सीबीआयचा तपास गुलदस्त्यातच आहे.