‘भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार’- नाना पटोले.
काँग्रेसच्या गाभा समितीची मंगळवारी मुंबईमध्ये बैठक पार पडली. यासाठी महाराष्ट्र प्रभारी एच. के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित होते. महाविकास आघाडी मजबूत करण्याच्या दृष्टीने तसेच आगामी निवडणूकीत भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. तर आगामी लोकसभा निवडणुकीत या सरकारचा पराभव करणे हे आता काँग्रेस पक्षाचे ध्येय असल्याचे पटोलेंनी सांगितले.