पुणे,पिंपरी,चिंचवड,करीता गुड न्यूज,सिंहगड एक्स्प्रेसबाबत मध्य रेल्वेचा मोठा निर्णय.
पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसचे दोन द्वितीय श्रेणी चेअर कारचे अनारक्षित डबे पिंपरी आणि चिंचवडसाठी राखीव ठेवण्याचा मोठा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पिंपरी आणि चिंचवडच्या प्रवाशांना स्वतंत्र डबे उपलब्ध झाल्याने गर्दी टाळण्यास मदत होणार आहे.
११ जूनपासून पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र डबे राहणार आहे. पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र डबे सिंहगड एक्स्प्रेसचा एक डबा वाढविण्यात आला होता. पण, तो कोणासाठी राखीव हे स्पष्ट केले नव्हते.डबा वाढविण्यापूर्वी पिंपरी-चिंचवडला एकच डबा राखीव होता. मात्र पिंपरीसाठी डी-७ इंजिनपासून आठवा डबा आणि चिंचवड स्थानकासाठी डी-८ इंजिनपासून नववा डबा देण्यात आला आहे. खडकी, शिवाजीनगर आणि लोणावळा येथील उर्वरित डब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.