September 28, 2023
PC News24
राजकारण

शरद पवारांना ठार मारण्याची धमकी प्रकरणात नवी माहिती समोर

शरद पवारांना ठार मारण्याची धमकी प्रकरणात नवी माहिती समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून ‘तुमचा दाभोलकर करू’ अशी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी सागर बर्वे (३४) याला पुण्यातून अटक करण्यात आली दरम्यान, सागर बर्वेने दिलेल्या धमकी प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. केवळ लग्न जमत नसल्यामुळे एका तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरून आणि नर्मदाबाई पटवर्धन या नावाच्या फेक अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती. सागर बर्वे हा तरुण अविवाहित असून कोणत्याही राजकीय पक्षाशी तो निगडित नसल्याचे समजते. काही केल्या त्याचे लग्न जमत नव्हते. त्यात महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या फोटोवरून वाद निर्माण झाला.

आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगत गेल्या. या साऱ्याचा राग येऊन त्याने ही धमकीची पोस्ट लिहिली. याशिवाय यामागे आपला कोणताही हेतू नसल्याची माहिती सागरने पोलिसांना दिली आहे.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्लीतला भूखंड गमावला,आता बंगलाही काढून घेतला जाण्याची शक्यता.

pcnews24

समाज कल्याण विभागाकडून परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरू.-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

pcnews24

पवारांच्या राजीनाम्यावर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया

pcnews24

IPL 2023: विराट कोहलीचा बंगळुरू संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? ‘या’ खेळाडूंवर असेल मदार

Admin

कुणबी vs मराठा : आता कुणबी समाजाचा एल्गार

pcnews24

‘ ई डी चा धाक… शरद पवार बाप..’ नाशिकमध्ये NCP कार्यालयावरून अजित पवार गट व शरद पवार गट आमने सामने, प्रचंड घोषणाबाजी.

pcnews24

Leave a Comment