बसवेश्वर महाराज पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण
सहा महिने अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते सायंकाळी चार वाजता होणार आहे.
महात्मा बसवेश्वर पुतळा समिती व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या महात्मा बसवेश्वर पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे,आमदार बनसोडे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप,आमदार उमा खापरे उपस्थित राहणार आहेत.प्राधिकरण निगडी येथे भक्ती शक्ती चौक ते अप्पूघर रोड या रस्त्यावर उभारण्यात आला आहे.शहरामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवावा अशी मागणी लिंगायत समाजाकडून होत होती. यासाठी पुतळा समिती तयार करण्यात आली. या समितीने लोक वर्गणीतून महात्मा बसवेश्वर महाराजांचा बारा फूट उंचीचा पुतळा बनवून घेतला आहे. ब्रॉन्झ धातूने बनवलेला हा ईस्टलिंग धारक असा पुतळा आहे.
शिल्पकार श्री पंकज तांबे यांनी हा पुतळा बनविला असून यासाठी 27 लाख रुपये खर्च आला आहे. महापालिकेने यासाठी जागा, सीमा भिंत, पुतळ्यासाठी चौथारा, सुशोभीकरण, विद्युत व्यवस्था तसेच गार्डनचे काम करून दिले आहे. यासाठी मनपा सल्लागार मे. शैलेश शहा यांची नियुक्ती केली होती.
सदर पुतळा बसवणे कामी, पुतळा समितीने व महानगरपालिकेने शासनाच्या सर्व मान्यता प्राप्त केले आहे. त्यानंतर पुतळा समितीने म. बसवेश्वर महाराजांचा पुतळा महापालिकेकडे सुपूर्त केला आहे. अशी माहिती पुतळा समितीचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी दिली.