केवळ पाचशे रुपयांसाठी पेव्हर ब्लॉकने मारहाण
चिंचवड स्टेशन जवळील पुलाखाली सोमवारी (दि.12) रात्री केवळ पाचशे रुपये दिले नाहीत म्हणून दोघांनी विटेने व पेव्हर ब्लॉकने तिघांना मारहाण केली आहे.
याप्रकऱणी पोलिसांनी तुषार ऊर्फ सनी सुरेश गायकवाड (वय 24 रा.चिंचवड) व आदेश ऊर्फ भैय्या बप्पा ऊर्फ सुरेश गायकवाड (वय 23 रा. चिंचवड) यांना अटक केली असून रणजीत राजू शेट्टी (वय 28 रा.चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ व एक मित्र हे तिघे पुलाखाली बसले असताना आरोपी दुचाकीवरून आले त्यांनी फिर्यादीचा मावस भाऊ साईप्रसाद याच्याकडे 500 रुपये मागितले. यावेळी साईप्रसादने दिले नाहीत याचा राग आला व आरोपींनी पेव्हर ब्लॉक तसेच विटांनी मारहाण केली फिर्यादी यांचा मित्र तेथे वाचविण्यास गेला असता त्याला देखील मारहाण कऱण्यात आली यावरून निगडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.