बार्टी तर्फे संविधान दिंडीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर संविधानाचा जागर
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव सुमंतजी भांगे महाराष्ट्र शासन यांच्या मुख्य संकल्पनेतुन व मा.आयुक्त प्रशांतजी नारनवरे (समाज कल्याण विभाग) व महासंचालक सुनीलजी वारे (बार्टी) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे यांच्या मार्फत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या बरोबर यावर्षी “संविधान दिंडी” चे आयोजन करण्यात आलेले आहे.
दोन्ही पालख्यांचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालेले असून त्या अनुषंगाने बार्टीचा “संविधान रथाचे प्रस्थान देखील आळंदी येथून पंढरपूरकडे झालेले आहे. संविधान विषयक प्रबोधन करण्यासाठी “संविधान रथ” सजविण्यात येतो. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
सर्व जनमानसात भारतीय संविधानाची माहिती व्हावी, आपले अधिकार, कर्तव्याची जाणीव व्हावी तसेच संतांच्या समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिंडीचा हेतू आहे.
या संविधान दिंडी मध्ये भारतीय संविधानाबद्दल तीन प्रश्न विचारून विजेत्यांना भारतीय संविधानाची प्रत, संविधान प्रास्ताविका भेट देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
वारकरी बांधवांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाटप करून त्यांना भारतीय संविधानाबद्दल आपल्या मूलभूत अधिकार व कर्तव्याची माहिती देण्यात येत आहे.
संविधान दिंडीस वारकरी बांधवांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून,दिंडीच्या मार्गाने वारकऱ्यांच्या विसाव्या ठिकाणी प्रबोधनात्मक, संविधान आधारित विविध उपक्रम, शाहीरी जलसा यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
संविधान दिंडीमध्ये बार्टीचे निबंधक इंदिरा आस्वार,विभाग प्रमुख श्रीमती स्नेहल भोसले,विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, विभाग प्रमुख श्री. रवींद्र कदम ,विभाग प्रमुख, आरती भोसले, विभाग प्रमुख सतीश पाटील, विभाग प्रमुख अनिल कारंडे, विभाग प्रमुख श्रीमती वृषाली शिंदे ,कार्यालयीन अधीक्षक सचिन जगदाळे,सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी, प्रकल्प अधिकारी शितल बंडगर, व मनोज खंडारे, तेजस्वी सोनवणे, विशाखा सहारे, उषा भिंगारे तसेच पुणे जिल्हा समतादूत किर्ती आखाडे, तेजस्विनी कांबळे, प्रशांत कुलकर्णी, संगीता शहाडे,भारती अवघडे, सचिन कांबळे व शशिकांत जाधव या समतादूतांचा सक्रीय सहभाग आहे.