September 26, 2023
PC News24
पिंपरी चिंचवडमहानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणार, तर 100 जप्त मालमत्तांचा होणार लिलाव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणार, तर 100 जप्त मालमत्तांचा होणार लिलाव

नवीन आर्थिक वर्षात (2023-24) महापालिकेने या वर्षाच्या सुरुवातीलाच थकीत करदात्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा धडाका लावला आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात त्या वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्याचा सर्वच सरकारी कार्यालयांचा प्रयत्न असतो परंतु यावर्षी महापालिका जप्तीची कारवाई सुरवातीपासूनच करणार आहे.

31 मार्च 2023 अखेर पिंपरी-चिंचवड शहरातील 50 हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ता पालिकेच्या रडारवर आहेत. त्यातील 39 हजार 655 मालमत्ताधारकांकडे तब्बल 650 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. तो वसुलीसाठी सुरुवातीस एसएमएस, कॉलिंगद्वारे आवाहन केले जाणार आहे. त्यानंतरही तो न भरल्यास पंधरा दिवसांत जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालिकेने आज दिला आहे.

गतवर्षी जप्त केलेल्या निवासी, बिगर निवासी तसेच औद्योगिक मालमत्तेच्या थकबाकीदारांच्या शंभर मालमत्तांचा लिलाव येत्या दोन महिन्यात करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. मिळकतकर हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य आणि मोठा स्त्रोत आहे. गतवर्षी साडेतीनशे कोटी थकीत असलेला कर वसूल करण्याची कामगिरी महापालिकेने केली होती.

1 लाखांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत असलेल्या 22 हजार मालमत्ता धारकांना 2023-24 या आर्थिक वर्षाच्या कराच्या बिलावाबरोबरच जप्ती पूर्व नोटीसा बजावल्या आहेत. 39 हजार 655 मालमत्ता धारकांकडे 647 कोटी 62 लाख 40 हजार रुपयांचा कर थकीत आहे. पहिल्या तीन महिन्यात 30 जून अखेर 400 कोटी रुपयांचा कर जमा करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.
यावर्षी (2023-24)
1 हजार कोटींचे करवसुलीचे टार्गेट पालिकेने ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी जुना थकीत कर जास्तीत जास्त प्रमाणात कसा वसूल होईल, यासाठी प्रयत्न पालिकेने सुरू केले आहेत.

Related posts

प्राधिकरणाने मंजुर केलेला भूखंड निगडी व्यापारी संघटनेला मिळावा.निगडी व्यापारी संघटनेच्यावतीने, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन.

pcnews24

चिखली पोलीस ठाण्याचे होणार हक्काच्या जागेत स्थलांतर

pcnews24

जुनी सांगवी येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची रहिवाश्यांकडून मागणी.

pcnews24

अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या महिलेची पोलीस ठाण्यात आत्महत्या.

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय यांची संयुक्त गणेशोत्सव बैठक संपन्न.

pcnews24

पदपथ घेणार मोकळा श्वास, जाणून घ्या पालिकेचे नवीन धोरण.

pcnews24

Leave a Comment