March 2, 2024
PC News24
गुन्हा

तळेगाव येथे पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक

तळेगाव येथे पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक

खंडणी विरोधी पथकाने पिस्टल बाळगल्या प्रकरणी मंगळवारी (दि. 13) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एमआयडीसी परिसरातून एकास अटक केली आहे.

विशाल चव्हाण (वय 43, रा. तळेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार आशिष बोटके यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी परिसरातील कातवी येथे एकजण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून विशाल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Related posts

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या ६ जणांना अटक

pcnews24

भोसरीमध्ये टोळक्याचा हैदोस ; वाहने अडवून पैशाची मागणी.

pcnews24

..आणि इमारती हादरल्या…सर्वात भयंकर मोठी दुर्घटना टळली! ताथवडे गॅस घटना ..आरोग्यमंत्री तानाजी सावंत घटनास्थळी दाखल पोलिसांना फटकारले!

pcnews24

तरुणीची भीमा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या

pcnews24

युट्युब चॅनल टास्क सबस्क्राईबच्या बहाण्याने 76 लाखाला गंडा.

pcnews24

पत्नी आणि सासुरवाडीचा त्रास, पतीचा गळफास; पुण्यात हडपसर येथील घटना

pcnews24

Leave a Comment