राष्ट्रवादीला मोठा धक्का
अजित पवार यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंद्यात राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का बसला आहे. हैदराबाद येथील मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, शेलार यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभूत व्हावं लागलं होतं.