जाहिरातीच्या वादानंतर फडणवीस म्हणाले…
जाहिरातीवरून सुरु झालेल्या वादाप्रकरणी अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमधील कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले. एका जाहिरातीने आमच्यात दुरावा येणार नाही, एका जाहिरातीने वाद होणारे आमचे सरकार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या 25 वर्षांपासून आमचे संबंध आहेत आणि गेल्या वर्षभरात हे संबंध आणखी घट्ट झाले आहेत, असेही फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांगितले.