बृजभूषण सिंह यांना क्लिनचीट !
बृजभूषण सिंह यांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांकडून राऊज एवेन्यू कोर्टात पॉक्सो प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीने बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र या प्रकरणी कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, असा खुलासा पोलिसांनी या रिपोर्टमध्ये केला आहे. अल्पवयीन कुस्तीपटूने आपली साक्ष बदलली आहे. आधी तिने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. नंतर भेदभाव केल्याचे म्हटले.