पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक उद्यान निरीक्षकास लाच घेताना अटक तर कामावरून निलंबित
किरण अर्जुन मांजरे या महापालिकेच्या सहाय्यक उद्यान
निरीक्षकास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले व त्याच्यावर गुन्हा दाखल करून कामावरून निलंबित करण्यात आले आहे तसेच त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. या आदेशाची मांजरे याच्या सेवा नोंद पुस्तकात नोंदही करण्यात येणार आहे.
किरण मांजरे हा महापालिकेच्या उद्यान विभागात सहाय्यक उद्यान निरीक्षक म्हणून काम करत होता. एका ठेकेदाराला दोन फर्मचे ऑडिट रिपोर्ट अनुकूल देण्यासाठी आणि उद्यानाच्या केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 17 हजार रूपयांची लाच मागितली. ही लाच घेत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नेहरूनगर येथे त्याला रंगेहाथ पकडले आहे.त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे. महापालिकेने त्याला सेवेतून बडतर्फ केले आहे.