September 23, 2023
PC News24
राजकारण

‘मोदी@9 जनसंपर्क अभियान’भाजपा युवा मोर्चातर्फे ‘लाभार्थी संवाद’ चे आयोजन

‘मोदी@9 जनसंपर्क अभियान’भाजपा युवा मोर्चातर्फे ‘लाभार्थी संवाद’ चे आयोजन

भाजपा शहराध्यक्ष तथा शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने कुदळवाडी येथे केंद्रातील मोदी सरकारला यशस्वी नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात ‘मोदी@9 जनसंपर्क अभियान’अंतर्गत ‘लाभार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक लाभार्थी या ठिकाणी उपस्थित होते. सर्व लाभार्थी यांनी ज्या योजनेचा लाभ घेतला त्याची सविस्तर माहिती दिली.

सर्व समाजातील नागरिकांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी सामान्य नागरिकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करत आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत या योजना पोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते काम करीत आहेत,अशा भावना राहुल लोणीकर यांनी व्यक्त केल्या.

यावेळी भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजयुमो राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी गौरव गौतम, सुदर्शन पाटसकर, गणेश वर्पे, अजित कुलथे, संकेत चोंधे, शिवराज लांडगे,रवी जांभुळकर, उदय गायकवाड, संतोष मोरे, सचिन जयभाय हे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन साळी यांनी केले.

Related posts

राम मंदिरासाठी पाठवलेलं गडचिरोलीतील लाकूड 1000 वर्षांपर्यंत टिकणार, ऊन-पाऊस, किडीचा प्रभाव नसेल

Admin

पुढील 15 दिवसांत ‘हे ‘ सरकार कोसळणार,संजय राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ ….

pcnews24

महाराष्ट्र:भुजबळांची पुन्हा वादग्रस्त विधाने;संभाजी भिडे गुरुजी, देवी सरस्वती यांना पुन्हा वादात ओढले.

pcnews24

ब्रेकिंग: अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे अनेक मंत्री शरद पवार यांच्या भेटीला.

pcnews24

‘विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी अस्वस्थ’ :शरद पवार.

pcnews24

मनसेच्या उपशाखाप्रमुखाचा मृत्यू

pcnews24

Leave a Comment