कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय बदलला.भाजपला धक्का.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने आधीच्या भाजप सरकारचा निर्णय बदलला आहे. सत्तेत येताच धर्मांतरण विरोधी कायदा रद्द करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. हे आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी पूर्ण केले आहे. त्यांच्या कॅबिनेटने धर्मांतरण विरोधी कायदा रद्द केला आहे. तसेच आरएसएसचे संस्थापक डॉ. के. बी. हेडगेवार व सावरकर यांच्यासंदर्भातील अभ्यासक्रम शाळेच्या पुस्तकातून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.