सत्ता आल्यास तेलंगणातील कृषी प्रारूप- • केसीआर
भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेतला. या कार्यक्रमात बोलताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मोठी घोषणा केली. सत्ता प्राप्त केल्यानंतर येथे तेलंगणमधील कृषी प्रारूप लागू करू, त्याद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू, असे ते म्हणाले. तेलंगणात शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाते. 5 लाखांचा विमा आहे.