मेहूल चोक्सीची बँक खाती जप्त करण्याचे आदेश
13 हजार कोटी रूपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी फरार असलेल्या मेहूल चोक्सीविरोधात सेबीने मोठा निर्णय घेतला. त्याचे बँक खाती, शेअर्स, म्युच्युअल फंडाची खाती जप्त करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 2022 साली गीतांजली जेम्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये ट्रेडिंगशी संबंधित फसवणूकीप्रकरणी सेबीने त्याला 5 कोटी रूपयांचा दंड केला होता. तसेच या दंडासह व्याज रक्कम 35 लाख रूपये वसुल करण्यासाठी सेबीने हा आदेश दिला.