भारतात शुद्धीकरणाच्या अटीवर पाकिस्तानला मिळणार स्वस्त रशियन तेल
रशियन तेलाची पहिली खेप रविवारी कराचीत आली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या जनतेला अभिमानाने सांगितले, ‘रशियासोबत एक लाख टन तेलाचा करार झाला आहे. त्यापैकी ४५ हजार टन आम्हाला मिळाले. पण ते कोणत्या अटींवर मिळाले हे शाहबाज यांनी सांगितले नाही. ते कोठे शुद्धीकरण केले जाते? ते पाकिस्तानात कसे पोहोचले? याबाबत भास्करने टप्प्याटप्प्याने तपास केला तेव्हा आढळले की रशियन तेल शुद्धीकरण फक्त भारतातच हाेईल आणि चिनी चलन युआनमध्ये पैसे द्यावे लागतील या अटीवर २०% कमी किमतीत तेल दिले आहे. अनेक दिवसांपासून ते मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान सरकारने दोन्ही अटी मान्य केल्या, पण ते जाहीर केले नाही. म्हणूनच भारतात वाडीनार रिफायनरीत (गुजरात) तेल शुद्ध केल्यानंतर ते अमिरातीत नेले. तेथून कराचीला पोहोचताच सरकारने ही घोषणा केली.तरी फायदा नाही; जितकी सूट मिळाली,तितका शुद्धीकरण,वाहतुकीवर खर्च होतो आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८० डॉलर आहे. रशियाकडून २०% सवलत मिळाल्याने किंमत प्रति बॅरल ६४ डाॅलर पडली. शुद्धीकरण खर्च प्रति बॅरल ४ डाॅलरपर्यंत कमी झाला. तर वाहतुकीवर प्रति बॅरल १२ डाॅलर खर्च आला त्यामुळे पाकिस्तान सरकार रशियन तेल करारावर पुनर्विचार करू शकते.
पाकिस्तानने खरेदी केलेले रशियन तेल गुजरातमध्ये रिफाइन,अमिरातीमार्गे कराचीत भारताशी करार नाही, म्हणून अमिरातीचा मार्ग निवडला.पाकिस्ताननेही भारतासोबत चर्चेचा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न केला. थेट भारतातून तेल हवे होते.पण त्याचा काही उपयोग झाला नाही. काही रशियन सरकारी कंपन्या अमिरातीमधून काम करतात. अशाच एका कंपनीने रशियन तेल कराचीला नेण्यास मदत केली. कारण, शिपमेंट गुजरातहून थेट कराचीला जाऊ शकत नव्हती.
८ मे रोजी रशियातून थेट गुजरातमध्ये शिपमेंट
कराचीत येणारे रशियन तेल ८-९ मे च्या मध्यरात्री रशियातील प्रिमोर्स्क (बाल्टिक समुद्र) येथून कॅरोलिन बेनगाझी क्रूड ऑइल टँकरमध्ये भरले गेले. त्याचा कार्गो आयएमओ क्रमांक ९२२४४३६ होता. ही शिपमेंट गुजरातच्या वाडीनार बंदरात पोहोचली.शुद्धीकरणा नंतर या कार्गोने अमिराती गाठले. तेथून ते पुन्हा कराचीला ६ जून रोजी कार्गो अायएमअाे क्रमांक ९२५९८८६ म्हणून रवाना झाले. ११ जूनला कराचीला पोहोचले. रशियन तेलाची दुसरी खेपही रशियातून निघाली आहे. त्याचा अायएमअाे क्रमांक ९३१०५२५ आहे. ही खेपही थेट पाकिस्तानात पोहोचणार नाही. त्यात ५५ हजार टन कच्चे तेल आहे.
भारतात शुद्धीकरणासाठी पाकिस्तान तयार आहे
याची दोन कारणे आहेत. वाडीनार रिफायनरीमधील ४९.१३% हिस्सा रोझनेफ्ट कंपनीचा आहे, जी रशियन सरकार चालवते. त्याचे मुख्यालय मॉस्कोत आहे. त्यामुळेच येथे शुद्धीकरण करण्यात आले. दुसरे म्हणजे पाकिस्तानच्या सरकारी केंद्रांमध्ये रशियन तेलाच्या शुद्धीकरणासाठी खूप आधुनिकीकरणाची गरज आहे. सध्या तेथे सौदी अरेबियातून येणारे तेल शुद्ध केले जाते. दोघांमध्ये खूप फरक आहे. सौदी अरेबियाच्या तेलातून २५% इंधन आणि ४५% डिझेल मिळतेे. रशियन तेल चांगल्या दर्जाचे आहे त्यातून ५०% इंधन आणि ३२% डिझेल तयार हाेते.
हमदानी हे ३० वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहेत. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द इंडिपेंडंट’ व ‘बीबीसी’तही काम केले. पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘द न्यूज’मध्येही ते कार्यरत होते. पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या धोरणात्मक विषयांवर दीर्घकाळापासून अांतरराष्ट्रीय वृत्तपत्रांसाठी ते लिखाण करत आहेत.