११ व्या शतकातील ऐतिहासिक प्राचीन पळसनाथाचे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास असलेले ग्रामदैवत श्री पळसनाथाचे प्राचीन मंदिर उजनी धरणाच्या पाण्यात राहूनही इतक्या वर्षानंतर सुस्थितीत असल्याचे आढळून आले आहे.
(फोटो क्रेडिट : फेसबुक -पळसदएव माय व्हावेत बरोबर रोहित चव्हाण)
सध्या उजनी धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने धरणाच्या परिसरात एक ११ व्या शतकातील प्राचीन हेमाडपंथी मंदिराचा खजिना समोर आला आहे.उजनी धरण पाण्याची पातळी कमी झाली की हे मंदिर नागरिकांचे आकर्षण असते. आता हे संपूर्ण मंदिर दिसत आहे. मंदिरासमोरील ओवऱ्यांचे छत उघडे झाले आहे.
अद्याप मंदिराचे प्रवेशद्वार पाण्यात आहे. येत्या काही दिवसांत तेही पाण्याबाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पाहण्यासाठी नागरिकांची आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे.