मान्सून लांबला, 23 जून ला सक्रिय होणार!!
बिपरजॉय चक्रीवादळ प्रदीर्घ काळापासून अरबी समुद्रात घोंगावत असल्यामुळे मान्सून सक्रिय होण्यास अडथळा येत आहे. मान्सून 16 जून रोजी सक्रीय होणार होता. मात्र हवामान विभागाने दलेल्या नवीन अंदाजप्रमाणे मान्सून आता 23 जून पासून भारतभर जोर धरेल असे हवामान खात्याने सांगितले आहे. याचे मुख्य कारण बिपरजॉय चक्रीवादळ आहे अशी माहिती हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
मिळालेल्या नवीन अंदाजानुसार राजस्थान वगळता देशाच्या अन्य भागांत मोसमी पाऊस 23 जूननंतर सक्रिय होईल. मोसमी वारे 16 ते 22 जून या काळात ईशान्य भारत, सिक्कीम आणि बिहारच्या काही भागांत दाखल होतील.23 ते 29 जून या काळात मोसमी वारे राजस्थान वगळता पूर्ण देशात दाखल होऊन देशाच्या बहुतांश भागांत पाऊस सुरू होईल.30 जून ते 13 जुलै या आठवडय़ात देशात सर्व ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर 7 ते 13 जुलै या काळात कोकण वगळता पावसात काहीसा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.