March 1, 2024
PC News24
शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक

जगातील सर्वश्रेष्ठ १० शाळांच्या यादीत ५ शाळा भारतीय..त्यापैकी महाराष्ट्रातील ३ शाळांचा समावेश.

जगातील सर्वश्रेष्ठ १० शाळांच्या यादीत ५ शाळा भारतीय..त्यापैकी महाराष्ट्रातील ३ शाळांचा समावेश.

वर्ल्ड बेस्ट स्कूल टॉप १० च्या यादीत देशातील पाच शाळांनी स्थान पटकाविले आहे. जगातील सर्वश्रेष्ठ शाळांच्या यादीत वेगवेगळ्या कॅटेगरीतून १० शाळा निवडण्यात आल्या आहेत. भारतासाठी अभिमानाची बाब म्हणजे ५ शाळाची निवड झाली असून पैकी तीन शाळा या आपल्या महाराष्ट्रातील आहेत.

यामधे जिंकल्यास पहिल्या क्रमांकाच्या शाळेला तब्बल अडीज लाख डॉलरचे बक्षिस मिळणार आहे.वर्ल्ड बेस्ट स्कूल अवॉर्डचे आयोजन युकेमध्ये करण्यात आले आहे. समाजाच्या प्रगतीमध्ये शाळांचे योगदान आणि जगभरातील शाळांना एक मोठे व्यासपीठ मिळण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

प्रत्येक कॅटेगरीतील टॉप ३ शाळांची घोषणा या पुरस्कारातून करण्यात येणार आहे. ही घोषणा सप्टेंबरमध्ये होणार आहे. यानंतर विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये केली जाणरा आहे. पाच कॅटेगरींना पाच पुरस्कार मिळणार आहेत. अडीज लाख अमेरिकी डॉलर एवढी बक्षिसाची रक्कम पाच जणांमध्ये समान वाटून दिली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक शाळेला 50,000 डॉलर मिळणार आहेत.

 

भारतातील या शाळांची स्पर्धेत निवड….

भारतातील शाळांपैकी १)दिल्लीची सरकारी शाळा ‘नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय (NPBV) F-ब्लॉक, दिलशाद कॉलनी .. त्याच कॅटेगरीमध्ये

२)मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशन स्कूल आहे. ३)गुजरात अहमदाबाद ची रिव्हरसाईड इंटरनॅशनल स्कूल आहे.

महाराष्ट्रातून आणखी दोन शाळापैकी एक शाळा ४)अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल असून हेएचआयव्ही

एड्सग्रस्त आणि सेक्स वर्करांच्या कुटुंबातील मुलांना शिकवते.

५)पाचवी शाळा ही मुंबईतील आकांक्षा फाउंडेशनची शिंदेवाड़ी मुंबई पब्लिक स्कूल आहे.

Related posts

सौ.स्वाती कुलकर्णी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले.

pcnews24

प्रभाग क्र.२ बोऱ्हाडेवाडी येथील सुसज्ज शाळेचा लोकार्पण सोहळा.

pcnews24

महाराष्ट्र:अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा आता 3 ऑगस्ट रोजी होणार

pcnews24

आगामी आर्थिक वर्षात देशातील गेमिंग इंडस्ट्री तेजीत,”फ्रेमबॉक्स ऍनिमेशन इन्स्टिटयूटमधे“आर्टबॉक्स”चे प्रदर्शन.

pcnews24

रावेत पीसीओईआरच्या शिरपेचात बहुमानाचा तुरा…’नॅक’चे परीक्षण यशस्वीरीत्या पूर्ण ,ए++ सर्वोच्च श्रेणी प्राप्त

pcnews24

विद्यार्थ्याचे यश शिक्षकांच्या शिकविण्यावर अवलंबून – पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील,महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचे आयोजन.

pcnews24

Leave a Comment