वर्धापनदिनी झेपची नवी ‘ झेप ‘… ‘रेनवाॅटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट व सोलर सिस्टम प्रोजेक्टचे उद्घाटन
झेप पुनर्वसन केंद्र या संस्थेचा 16 वा वर्धापनदिन शुक्रवारी
(दि.16 जून) उत्साहात साजरा झाला.
वर्धापनदिन समारंभाला दरवर्षीप्रमाणे झेपच्या विद्यार्थ्यांनी केक कापून त्यांचा आनंद व्यक्त केला.डिजिटल झेपसोबतच आता नवीन ओळख म्हणजे झेपमधील पर्यावरणपूरक रेनवाॅटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट व सोलर सिस्टम प्रोजेक्टचा उद्घाटन सोहळा असे मुख्य आकर्षण होते.
या उद्घटनास Tata blue scope steel च्या मीना बहादुर, शिक्षा मिश्रा व वृषाली नावडकर उपस्थित होत्या.तसेच Lions club of pune phoenix चे श्री. अनिल झोपे, दीपश्री प्रभू,श्री. प्रदीप कुलकर्णी श्रीधर टोकणेकर यांची उद्घाटनाला प्रमुख उपस्थिती होती.श्री.नीलकंठ पोमण यांनी झेपला विशेष शुभेच्छा दिल्या.त्याचप्रमाणे अश्विनी कुलकर्णी,दिपाली सवाई राजश्री चिलेकर,तसेच पिंपरी चिंचवडच्या विविध प्रसिद्ध उद्योजिका आणि झेपच्या शिक्षक,थेरपीस्ट,शिक्षकेतर वर्ग, व मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी पालक, हितचिंतक सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित होते.