मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात खबरदारी नागरिकांना ‘ORS’चे वाटप
पिंपरी – चिंचवड शहरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्या अगोदर कार्यक्रमाला उपस्थित आणि येणाऱ्या नागरिकांना ‘ओआरएस’ची पाकिटे देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरात या अगोदर झालेल्या कोणत्याही राजकीय किंवा शासकीय कार्यक्रमात नागरिकांची एवढी काळजी घेण्यात आलेली नव्हती.
पिंपरी-चिंचवड शहरात शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत कार्यक्रम होणार आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या घराच्या जवळच हा कार्यक्रम आयोजित केला आहे.