पिंपरी: पश्चिम बंगालच्या तरुणीचा विनयभंग,पिंपरी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापती विरुद्ध गुन्हा दाखल.
नोकरीसाठी पश्चिम बंगालवरुन आलेल्या तरुणीच्या विनयभंगप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार पिंपरी आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
याबाबत पश्चिम बंगाल मधून आलेल्या एका २८ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश्वर रेड्डी, चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी (तिघेही रा. कोंढवा, पुणे) आणि अर्जुन ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीला एका संकेतस्थळावर एका महिलेचा नंबर मिळाला. त्या महिलेने तरुणीला बॅंकेत नोकरीसाठी मुलाखत असल्याचे सांगत पुण्यात बोलविले. नंतर बॅंकेत नोकरीसाठी वेळ लागणार असल्याचे सांगून इतर नोकरीसाठी अर्जुन ठाकरे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.
अर्जुन ठाकरे हे पिंपरी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत.