वंचित म्हणजे पायात पाय घालणारी B टीम : शरद पवार
महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वंचित म्हणजे पायात पाय घालणारी बी टीम आहे असा थेट आरोप करून आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी नो एन्ट्री असे तर सुचवले नाही ना अशी चर्चा होत आहे.
शरद पवार हे आज जळगावमध्ये आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्रातील एंट्रीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पवारांनी निशाणा मात्र वंचित वर साधला. मागची निवडणूक आठवली तर आम्हाला काही नुकसान सहन करावे लागेल. ते नुकसान वंचितच्या वतीने करण्यात आले. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार अधिकार आहे. कोणालाही कुठही जाऊन काम करण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रात अस दिसतय की स्वतः लढायच असत आणि दुसऱ्या एक- दोन टीम पायात पाय घालण्यासाठी तयार करायच्या असतात. याला राजकारणाची बी टीम म्हणतात. ही बी आहे की कसं तेआता कळेल असं शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी वंचित बहुजन आघाडीवर थेट आरोप केल्यानंतर वंचित (प्रकाश आंबेडकर)साठी महाविकास आघाडीचे दरवाजे कायमचे बंद तर झाले ना अशी शक्यता निर्माण झाली आहे. पवारांच्या या आरोपांवर प्रकाश आंबेडकर नेमकं काय प्रत्युत्तर देणार याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. तसेच याबाबत ठाकरे गटाची भूमिका नेमकी काय असेल हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
शरद पवारांच्या या भूमिकेचा शिवसेना उबाठा ने वंचित बरोबर केलेल्या आघाडीवर काय परिणाम होतो हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.