आम्ही चांगले काम करत आहोत, एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर काही परिणाम होणार : एकनाथ शिंदे
पिंपरी चिंचवड येथील आजच्या दौऱ्याच्या वेळी,थेरगाव येथे शासन आपल्या दारी या उपक्रम कार्यक्रमात (CM) मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. एका विचाराने शिवसेना-भाजपची युती झालेली आहे. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेतून पुढे आलेली युती आहे. त्यामुळे एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर काही परिणाम होणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तरे देणार आहे.एकही लाभार्थी वंचित राहणार नाही ही शासनाची भूमिका आहे. 95 हजार 964 लाभार्थीनी आता अर्ज केले आहेत. आतापर्यंत एकूण 35 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना थेट लाभ मिळाला आहे. 11 महिन्यातील निर्णय वाचायला वेळ पुरणार नाही. एवढे निर्णय घेतले आहेत. त्यातील काही निर्णय पहिल्यांदा घेतले आहेत.एसटी बसमध्ये महिलांना प्रवासदरात 50 टक्के सवलत तर जेष्ठांना मोफत बस प्रवास सुरु केला. या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना फायदा झाला. शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडून वर्षाला सहा हजार आणि राज्य सरकार कडून सहा हजार असे वर्षाला बारा हजार रुपये दिले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जात आहोत. आम्ही चांगले काम करत आहोत, म्हणून कुणी तरी सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणामध्ये मोदी यांना ८४ टक्के लोकांनी पसंती दिली, याचा मला आनंद आहे.जगभरात लोकप्रियतेमध्ये मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. याचा आम्हाला जास्त आनंद आहे. आपल्या देशाचे नाव जगात उंचाविण्याचे काम मोदी यांनी केले आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते घाबरले आहेत.