बेकायदेशीर पिस्टल बाळगल्या प्रकरणी हिंजवडी येथून दोघांना अटक.
बुधवारी (दि. 14) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हिंजवडी जवळ माणगाव येथे बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी हिंजवडी (Hinjawadi) पोलिसांनी दोघांना अटक केली आली.
ऋषिकेश सुभाष ओझरकर (वय 25, रा. ओझरकरवाडी, माण, ता. मुळशी), रोशन दशरथ तेलंगे (वय 21, रा. ओझरकरवाडी, ता. मुळशी. मूळ रा. यवतमाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अरुण नरळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.