September 28, 2023
PC News24
महानगरपालिका

पवना धरणातील पाणीसाठा केवळ 20 टक्‍क्‍यांवर… पाण्याचा काळजीपूर्वक वापर करा

पवना धरणातील पाणीसाठा केवळ 20 टक्‍क्‍यांवर… पाण्याचा काळजीपूर्वक वापर करा.

मावळातील पवना धरण शहरवासीयांची तहान भागविते. पाणीसाठा आला आहे. जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढाच म्हणजे केवळ 20टक्के पाणी साठा आहे. मागील वर्षी याच तारखेला 22.06 टक्के पाणीसाठा होता. यंदा कमी पाणीसाठा असल्यामुळे पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडसह, मावळ तालुक्‍यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण हेच आहे. या पाणलोट क्षेत्रात दोन हजार 777 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे तीन वेळा धरण शंभर टक्के भरले होते. ऑगस्ट अखेरपर्यंत पवना धरण तुडुंब भरले होते. शहराला 25 नोव्हेंबर 2019 पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. साडेतीन वर्षे झाले. तरी, शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी केले.

Related posts

डेंग्यू,चिकुनगुन्या आणि हिवताप याबाबत शहरवासियांनी काळजी घ्यावी – महानगरपालिकेचे आवाहन.

pcnews24

महानगरपालिका : कर न भरलेल्या मालमत्तांचा टप्या-टप्याने लिलाव.

pcnews24

हिंजवडी पोलिसां कडून जबरी चोर्‍या करणार्‍यांचा पर्दाफाश,चांदणी चौक परिसरातील अनेक गुन्हयांची उकल.

pcnews24

कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीच्या शासन निर्णयास विरोध.

pcnews24

पिंपरी चिंचवड: विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने व्यवस्था..

pcnews24

अतिक्रमण हटवण्याचे काम करताना महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण

pcnews24

Leave a Comment