September 28, 2023
PC News24
पिंपरी चिंचवड

मालमत्ता कर जनजागृतीसाठी महानगर पालिकेची अभिनव रील्स स्पर्धा.

मालमत्ता कर जनजागृतीसाठी महानगर पालिकेची अभिनव रील्स स्पर्धा

सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न होता उपयुक्त मा हिती ही आपण पोहोचवू शकतो.सध्या देशभरात इंस्टा,फेसबुक वर विविध विषयांवरची रील्सची चलती आहे. नव्या पिढीला केवळ मनोरंजन हव्या असणाऱ्या आजच्या रील्स बघायला व त्यातून झटपट माहिती मिळवायला फार आवडते.

याचाच वापर करून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने रील्सची एक अभिनव स्पर्धा ठेवली आहे ज्यामधे मिळणार आहे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे 5000 रु. तर द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस हे 3000 व 2000 रु.इतके असणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने गाणी, विनोद, संवाद या माध्यमातून रील्सद्वारे जनजागृती करणे अशी स्पर्धा आयोजित केली आहे.आणि रील्स द्वारे नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी ह्याची जनजागृती करायची ही मूळ कल्पना आहे. या रीलमध्ये सांगायची माहिती अशी आहे की मालमत्ता कर हा 30 जून पर्यंत भरावा व ऑनलाईन व आगाऊ भरल्यास 5 % करामध्ये सूट मिळेल. वेळेत कर भरून दंड टाळण्याचे आवाहन रील्समधे केलेले असावे.

मालमत्ताधारकांकडून मिळणार कर हा शहरासाठी व त्याचा विकासासाठी कसा उपयोगी आहे हे, दाखवून देणे रील्स मध्ये गरजेचे आहे. या स्पर्धेचे नियम 30 जूनच्या आत इंस्टाग्राम, फेसबुक किंवा ट्विटर द्वारे रील्स पोस्ट करायची आहे,रिल पोस्ट करताना #pcmcptaxconcession #ptaxreels #pcmcptaxreels हे हॅशटॅग वापरणे गरजेचे आहे.

यामधे कल्पक माहिती, सादरीकरण, रिल ला येणारे लाईक्स, योग्य हॅशटॅग हे निकष निकालासाठी विचारात घेण्यात येतील.

Related posts

“मेरी लाईफ,मेरा स्वच्छ शहर” उपक्रमा अंतर्गत “RRR केंद्र” स्थापन होणार..

pcnews24

क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक.

pcnews24

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे स्मार्ट सारथी अॅप देशात दुसरे तर राज्यात प्रथम-इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्ड – ‘गव्हर्नन्स’ पुरस्काराने सन्मान

pcnews24

सततच्या टोमण्याला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

pcnews24

मोशी येथे उभारणार धर्मवीर संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा..संभाजी भिडे गुरूजी यांच्याकडून ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ जागेची पाहणी.

pcnews24

स्मार्ट सिटी च्या अंतर्गत विविध रस्ते,आंतरीक रस्ते व सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्रकारांन करता जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.

pcnews24

Leave a Comment