लेखा परिक्षणासाठी आवश्यक माहिती उपलब्ध न केल्यास 25 हजार रुपये दंडात्मक कारवाई : PCMC आयुक्त शेखरसिंह
पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील प्रत्येक विभागाने चालू आर्थिक वर्षांतील लेखा परिक्षणासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून न दिल्यास विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर 25 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.
प्रत्येक विभागाने कामांचा तपशील, नोंदवही, बिले, सविस्तर ठराव, निविदा सादर या सारख्या बाबींची माहिती लेखा परीक्षण विभागाला देणे बंधनकारक आहे. मात्र, असे असताना काही विभाग लेखा परीक्षण विभागाला माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने वादग्रस्त रक्कमेचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याच उद्देशानेआता महापालिका आयुक्त सिंह यांनी चालू आर्थिक वर्षांतील विविध विषयांची माहिती तत्काळ लेखा परीक्षण विभागाला सादर करण्याचे बंधनकारक केले आहे.
काही त्रुटी निदर्शास येताच त्यामध्ये ताबडतोब दुरूस्ती केली जावी म्हणून महापालिकेने चालू आर्थिक वर्षांतच विविध विभागांकडून माहिती घेऊन लेखा परीक्षणाचे काम हाती घेतले आहे. यापूर्वी रेकॉर्ड उपलब्ध न झालेले प्रलंबित रक्कम ही जवळपास कोट्यावधी रूपयाच्या घरात जात आहे असे सांगण्यात येते.