वेल्हे तालुका : लायसन्स मिळवून देण्यासाठी लिपीकाने घेतली तीस हजार रुपयांची लाच
सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील लिपिकाने लायसन्स देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेतली यावेळी वेल्हे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने लिपिकाला रंगेहात पडकण्यात आले. या प्रकरणी 55 वर्षीय पुरुषाने तक्रार दाखल केली. तर लिपिक पंढरीनाथ मच्छिंद्रनाथ तमनर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की वेल्हे येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येथे तक्रारदार यांनी सावकारी लायसन्स मिळवण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. परंतु, जिल्हा निबंध कार्यालयात पाठपुरावा करून लायसन्स बनवून देण्यासाठी आरोपी पंढरीनाथने पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती.यात तीस हजार रुपये लायसन्सचे, वीस हजार रुपये स्वतःसाठी असे नियोजन करून 30 हजार रोख देऊन उर्वरित रक्कम बँकेत जमा करण्यास सांगितले.या रकमेतील तीस हजार रुपये स्वीकारताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पुढील तपास ला. प्र. वि. पुणे येथील पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करत आहेत.