व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक..कुलमुखत्यार पत्राचा गैरवापर
कुरुळी येथे सप्टेंबर 2004 ते जुलै 2022 या कालावधीत व्यावसायिकाच्या कुलमुखत्यार पत्राचा गैरवापर करत 196 गुंठे जमीन परस्पर विकत अडीच कोटींची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी राजेश शंकरलाल काकाणी (वय 51 रा.वाशी, नवी मुंबई) यांनी चाकण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.16) फिर्याद दिली असून शंभू धोंडिराम पवार ( रा.भोसरी) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.फिर्यादीच्या परस्पर 110 गुंठे जमीन सात लोकांना, तर 86 गुंठे जमीन ही दोन लोकांना विकली.अशा प्रकारे 196.9 गुंठे म्हणजे 2.59 कोटींची जमीन परस्पर विकली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.