महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागाची जबाबदारी विजयकुमार सरनाईक यांच्याकडे
भूमी आणि जिंदगी विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर महापालिकेत नव्याने रुजू झालेले सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांच्याकडे भूमी आणि जिंदगी, विशेष नियोजन प्राधिकरण, अतिक्रमण निर्मुलन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी जारी केला आहे. सरनाईक हे महापालिकेत 7 जून रोजी रुजू झाले. त्यांच्याकडे आत्तापर्यंत कोणत्याच विभागाचा पदभार देण्यात आला नव्हता. उपायुक्त ढोले यांची बदली होताच सहाय्यक आयुक्त सरनाईक यांच्याकडे तीन विभागाचा पदभार देण्यात आला आहे.