September 23, 2023
PC News24
गुन्हा

रहाटणीच्या स्पा सेंटरवर छापा,दोन पिडीतांची सुखरूप सुटका.

रहाटणीच्या स्पा सेंटरवर छापा,दोन पिडीतांची सुखरूप सुटका.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने रहाटणी येथील एका स्पा सेंटरवर छापा टाकला.यात दोन पीडित मुलींची सुखरूप सुटका केली असून दोघांना अटक झाली आहे.

या प्रकऱणी पोलिसांना एक महिला व रोहन विलास समुद्रे (वय 34 रा.पिंपरी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे शिवार चौकात APPLE SPA नावाने स्पा सेंटर चालवायचे. जिथे ते पीडितेकडून स्वतःच्या उपजिवेकासाठी वेश्या व्यवसाय करवून घेत होते.

य़ावरून पोलिसांनी आरोपींना अटक करत दोन मुलींची सुटका केली आहे. तर,आरोपींवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सिंग सिसोदे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.

Related posts

‘३० मुलींनाचे अपहरण करून हत्या करणाऱ्या त्या’ आरोपीला जन्मठेपेची शिक्षा.

pcnews24

पुण्यातील हॉटेल वैशालीचा वाद;4 वर्षांच्या मुलीला घेऊन वडील बेपत्ता.

pcnews24

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल किशोर आवारे हत्याप्रकरण

pcnews24

नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीची रायगड पोलिसात तक्रार.

pcnews24

वारजे येथे रस्त्याच्या कडेला सापडली दोन दिवसांची बेबी गर्ल

pcnews24

वडलांना मारल्याच्या रागातून केली निर्घृण हत्या.

pcnews24

Leave a Comment