‘लोकसेवकानेच घेतली लाच’ सापळा रचून केली अटक.
प्राधिकरण निगडी,सेक्टर नं. 27, येथे दि.17 रोजी सहायक पोलीस निरीक्षक,पो.शिपाई यांनीच तक्रार केलेल्या महिलेकडे (वय 48) रू.1,50,000/लाच मागितली व मागणी करण्यात आलेली 1,50,000/- रु.लाच त्यांनी स्विकारली.याप्रकरणी आरोपी लोकसेवक 1) अमोल प्रकाश कोरडे,
सहायक पोलीस निरीक्षक,2) सागर तुकाराम शेळके, पो.शिपाई , दोघे नेमणुक – निगडी पो.स्टे. पिंपरी-चिंचवड.पो.आयुक्तालय.
3) सुदेश शिवाजी नवले, वय 43 वर्ष, रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे (खाजगी इसम) यांना अटक करण्यात आली आहे.
14 ते 17जून रोजी याबाबत पडताळणी केली असता तक्रारदार महिलेच्या घरी सापळा रचून त्यांना पकडण्यात आले.
याबाबत हकीकत अशी की यातील तक्रारदार महिलेने त्यांच्या ओळखीचे इसमास हातऊसने व बँकेमधुन कर्ज काढून पैसे दिले होते. सदरचे बँक कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे तक्रारदार यांनी त्यांचेकडे ऊसने दिलेल्या पैशाची मागणी केली असता त्यांनी त्यांचे विरुद्ध निगडी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशी विभाग लोकसेवक अमोल कोरडे यांचेकडे असल्याने तक्रारदार यांचेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लोकसेवक अमोल कोरडे, पोलीस शिपाई सागर शेळके व खाजगी इसम नवले यांनी 1,50,000/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक स.पो.नि. कोरडे व पो.शि.शेळके यांच्या वतीने खाजगी इसम नवले यानी 1,50,000/- रुपयांची लाच मागणी केली व नवले यानी केलेल्या लाच मागणीस लोकसेवक कोरडे व शेळके यांनी दुजोरा देवून सहाय्य केले. लाच रक्कम नवले याने स्विकारल्यावर तिघांना ताब्यात घेण्यात आले असून,निगडी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
या सापळा पथकात पोलीस उप अधीक्षक – श्रीमती. माधुरी भोसले,पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर ,पो.हवा. नवनाथ वाळके, पो.शि. सौरभ महाशब्दे,म.पो.शि. शिल्पा तुपे,चालक पो.शि. पांडुरंग माळी, ला.प्र.वि. पुणे. आणि मार्गदर्शन अधिकारी.श्री.अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.पुणे परिक्षेत्र,श्रीमती शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे. यांनी ही कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पोलीस उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ 1064 या टोल फ्री क्र.वर संपर्क साधावा असे
म्हटले आहे.