श्रीरंग बारणे यांनी केले दिव्यांगांना साहित्याचे वाटप, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाचा उपक्रम
केंद्रीय सामाजिक मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या मान्यतेने खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून थेरगाव येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमातून दिव्यांगांना सशक्त करण्यासाठी आवश्यक साहित्याचे वाटप मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी थेरगाव येथे केले.या उपक्रमांतर्गत पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, पनवेल आणि खालापूर या सहा विधानसभा मतदारसंघात या साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्याच्या उपक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 16) थेरगाव येथे केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग बांधवास इलेक्ट्रिक सायकल दिली. मावळ लोकसभा मतदारसंघातील 271 लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
लोकसभा सदस्यांना एका टर्ममध्ये एकदाच अशाप्रकारे साहित्याचे वाटप करता येते. खासदार श्रीरंग बारणे यांनी मागील टर्म मध्ये दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वाटप केले होते. त्याचप्रमाणे आता पुन्हा साहित्याचे वाटप केले जाणार आहे. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम खासदार श्रीरंग बारणे करीत असतात त्यातील हा एक उपक्रम आहे. त्यांनी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिर घेतले आहे व गरजू दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप केले जात आहे.
या उपक्रमाला दिव्यांगांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंधांसाठी काठी, कर्णबधिर व्यक्तींसाठी कानाचे मशीन, व्हील चेअर, टॉयलेट भांडे आणि इतर साहित्य देण्यात आले.बुधवारी (दि. 21) पनवेल, गुरुवारी (दि. 22) कर्जत, खालापूर व उरण आणि शुक्रवारी (दि. 23) मावळ येथे हा उपक्रम राबविला जाणार आहे.